Wednesday, May 18, 2022

आज रात्री बदलणार ट्विटरचे मालक?:मस्क 3273 अब्ज रुपयांना खरेदी करु शकतात ट्विटर, कंपनीच्या शेअर्समध्ये 5.3% ची वाढ

Must Read

नवी दिल्ली: प्लॅटफॉर्म विकत घेण्याच्या एलन मस्क यांच्या ऑफरवर ट्विटर पुनर्विचार करत आहे, वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, रविवारी झालेल्या दोन बैठकींमध्ये याची चर्चा झाली. मस्क यांनी गुरुवारी सांगितले होते की, यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणूकची तयारी केली आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर कंपनी एलन मस्कला ट्विटर विकण्यास तयार आहे. अहवालात असे म्हटले आहे की मायक्रोब्लॉगिंग साइट व्यवहाराच्या अटींना अंतिम रूप देण्यावर काम करत आहे आणि जर चर्चा सुरळीत झाली तर सोमवारी लवकरात लवकर करार होऊ शकतो.

अलीकडेच, एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्ज डॉलर (सुमारे 3273.44 अब्ज रुपये) देऊ केले आहे. यावरून बराच वाद झाला होता. पण, आता एका नवीन रिपोर्टनुसार, ट्विटर मस्कसोबत हा करार करण्याची तयारी करत आहे. ट्विटर मस्क यांची 54.20 डॉलर प्रति शेअर ही ऑफर स्वीकारेल असे नाही तर यासाठी कंपनी मस्क यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर आणखी चांगली ऑफर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

ट्विटरचा या प्रस्तावावर नव्याने विचार

मीडिया रिपोर्ट्नुसार ट्विटर या प्रस्तावावर नव्याने विचार करत आहे आणि आधीच्या तुलनेत त्यावर चर्चेला अधिक वाव आहे. टेस्लाचे सीईओ मस्क यांनी गुरुवारी सांगितले की, व्यहारासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी जवळपास 46.5 अब्ज डॉलर सुरक्षित केले आहेत. याशिवाय, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या भागधारकांना थेट आवाहन करण्याचा विचार करत आहेत.

संचालक मंडळाने विरोध केला होता

अलीकडेच, ट्विटर बोर्डाने मस्क यांच्या ताब्यात कंपनी देण्यास प्रतिबंध करण्यासाठी ‘Poison Pill’ रणनीती स्वीकारली होती. मात्र आता, मस्क यांच्याशी वाटाघाटी करण्याची तयारी बोर्डच्या सदस्याांनी दाखवली आहे. यावरुन मस्क यांनी ही रणनीती फोल ठरवली आहे, असे दिसून येते.

मस्ककडे सध्या ९.२% शेअर्स आहेत. मस्क यांनी शुक्रवारी कंपनीच्या अनेक भागधारकांशी खासगीत भेट घेतल्यानंतर कंपनीमध्ये संभाव्य बदल झाल्याचेही जर्नलमधून सांगण्यात आले.

फ्रीडम ऑफ स्पीचवर काम करण्यासाठी घेणार विकत

मस्क यांनी यापूर्वी प्लॅटफॉर्म विकत घेण्यामागील कारण म्हणून भाषण स्वातंत्र्यावरील चिंतेचा उल्लेख केला होता. असे असले तरी संबंधीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी मस्क यांचा या पूर्वीचा व्यवहार या विपरीत असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, मस्क यांनी निधीवर लक्ष केंद्रित केलेच पण त्याच बरोबर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शेअर धारकांसोबत सक्रियपणे स्वत:च्या बाजूने पोशक वातावरण तयार केले. याचा परिणाम कंपनीच्या निर्णयावर पडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This