Tuesday, May 17, 2022

ग्रह दोष, दुर्भाग्य सतावत आहे? अर्धा सुका नारळ इथे गाडा.

Must Read

31 जानेवारी २०२२ आमावस्या ग्रह दोष, दुर्भाग्य सतावत आहे? अर्धा सुका नारळ इथे गाडा.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो अमावस्येची काळोखी रात्र हि तंत्र क्रियांसाठी, उपायांसाठी अत्यंत विशेष महत्वाची असते. या दिवशी दिवशी आपण आपल्या साधनांच्या सिद्धीना जलद जागृत करू शकतो. अमावस्येच्या रात्री अनेक प्रकारचे तंत्र-मंत्र, जादूटोने, केले जातात, यामध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे उपाय जो तो साधक त्याच्या इच्छेने करत असतो. प्रत्येक महिन्यातील आमावस्येच्या दिवशी, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ तर्पण केले जाते, दान केले जाते, पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. या दिवशी काही विशेष उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो. चला तर मग जाणून घेवूया आमावस्येच्या दिवशी करायच्या काही चमत्कारिक उपायांविषयी. पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

१* मित्रानो, आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या खराब स्थितीमुळे आपल्याला ग्रह दोषांचा सामना करावा लागत असेल, ग्रहांच्या दोषामुळे दुर्भाग्यपूर्ण जीवन जगावे लागत असेल, कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळत नसेल, आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल, तर अश्या परीस्थितीमध्ये ग्रह दोषांचे निवारण करण्यासाठी व त्यांचे शुभ परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी आणि खास करून शनिशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी आमावस्येच्या दिवशी मोहरीच्या तेलामध्ये गोड भजी बनवावेत. व हे गोड भजी अमावस्येच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावेत. या उपायामुळे आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रह, मजबूत होवून शुभ फळ द्यायला लागतील तसेच शनीशी संबंधित समस्यांचे देखील निवारण होवून जाईल.

२* मित्रानो जर का आपल्या कुंडलीमध्ये राहू व केतू हे ग्रह खराब स्थितीमध्ये असतील व आपल्याला त्यांचे अशुभ परिणाम प्राप्त होत असतील.तर आपण आमावस्येच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा. मित्रानो राहू व केतू हे जरी पाप ग्रह असले तरी जेंव्हा ते शुभ स्थितीमध्ये असतात तेंव्हा व्यक्तीला त्याच्या अतिउच्च स्थानावर घेवून जातात, अचानकपणे व मोठ्या प्रमाणात, अपार धनाची प्राप्ती राहू आणि केतू ग्रहांच्या शुभ परीनामातूनच साधता येते, व म्हणून राहू आणि केतू ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी आमावस्येच्या दिवशी आपण दोन जिवंत मासे पकडावेत किंवा ते शक्य नसल्यास एखाद्या कोळी बांधावा कडून, मासे विक्रेत्याकडून दोन जिवंत मासे विकत घ्यावेत व हे दोन्ही जिवंत मासे परत तलावामध्ये किंवा नदीमध्ये, विहिरीमध्ये सोडून द्यावेत. या उपायामुळे आपल्या कुंडलीतील राहू आणि केतू ग्रह मजबूत बनून शुभ फळ प्रदान करायला लागतील.

३* मित्रानो, जर का आपण बेरोजगार असाल, खूप कष्ट करून देखल आपल्याल नोकरी मिळत नसेल, रोजगाराचे साधन उपलब्ध होत नसेल, तर अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करून, एक डाग विरहित, पिवळा म्हणजेच पिकलेला लिंबू घ्यावा. शक्यतो या लोम्बुवर डाग नसावेत. व असा पिवळा लिंबू घेवून तो स्वच्छ पाण्याने धुवून, एखाद्या कपड्याने पुसून, आपल्या घरातील मंदिरामध्ये ठेवावा. दिवसभर हा लिंबू आपल्या घरातील देव्हार्यामध्येच ठेवावा. व यानंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी हा लिंबू घेवून आपल्या डोक्यावरून किंवा ज्याला नोकरी मिळवायची आहे, रोजगाराचे साधन प्राप्त करायचे आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ७ वेळेला उतरवून घ्यावा. लिंबू उतरवून झाल्यानंतर त्या लीमुचे ४ भाग करावेत, व घरातून बाहेर निघून कोणत्याही चौरस्त्याच्या ठिकाणी जावून, लीम्बुचे ४ तुकडे ४ दिशेला फेकून द्यावेत. जाताना व येताना कोणाशीही बोलू नये किंवा मागे वालीन पाहू नये. घर बाहेर आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करावा. या उयामुळे आल्याला रोजगाराचे साधन मिळून जाईल, आपल्याला आपल्या मनासारखी नोकरी मिळून जाईल.

४* मित्रानो आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह खराब स्थितीमध्ये असेल, व आपल्याला त्याचे अशुभ परिणाम प्राप्त होत असतील, किंवा आपल्याला शनीची साडेसाती चालू असेल, तर शनी दोष दूर करण्यासाठी आमावस्येच्या दिवशी सुक्या नारळाची आर्धी वाटी म्हणजेच अर्धा सुका नारळ घ्यावा व त्या नारळामध्ये साखर भरून, शक्य असल्यास एखाद्या निर्जन ठिकाणी जावून किंवा आपल्या घरातील बागेमध्ये ओलसर जमिनीमध्ये पुरावा, ओलसर जमिनीमध्ये हा साखर भरलेला अर्धा सुका नारळ गाडावा. या उपायामुळे शनी दोष समाप्त होवून, शनीचे शुभ परिणाम प्राप्त व्हायला लागतील.

५* मित्रानो आमावस्येच्या दिवशी आपल्या मृत परीजानांच्यासाठी, पुर्वाजाना शांती लाभण्यासाठी दान धर्म केल्याने, आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य ग्रहाशी संबंधित दोष समाप्त होवून, त्यांचे शुभ परिणाम प्राप्त व्हायला लागतात.

६* मित्रानो आमावस्येच्या दिवशी सकाळचे किंवा दुपारचे जेवणं घेताना, जेवणास सुरु करण्यापूर्वी आपल्या ताटातील एक-एक घास गाय, कुत्रा, पक्ष्यासाठी बाजूला काढून ठेवा, व यानंतर जेवणास सुरुवात करावी. या उपायामुळे आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त व्हायला लागेल, आपल्या मिळकतीमध्ये, उत्पन्नाच्या साधनामध्ये भरभराट व्हायला लागेल. दिवसेन दिवस आपली प्रगती व्हायला लागेल.

७* मित्रानो जर का आपण नजर दोषाने त्रस्त असाल तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर काळ्या घोड्याचा नाल अवश्य लावावी, पण लक्षात ठेवा कि, हि नाळ लावताना, या नालेचे उघडे तोंड हे वरच्या म्हणजे आकाशाच्या बाजूला असले पाहिजे. या उपायामुळे आपण नजर दोषातून मुक्त व्हाल.

८* मित्रानो आपल्या जीवनातील शनिदोष समाप्त करण्यासाठी तसेच घरातील कलह, भांडणे बंद होवून घरामध्ये शांतता राहावी यासाठी, एक अखंड सुका नारळ घेवून, या नारळाला वरच्या बाजूने एक लहान छिद्र करावे व या छिद्रातून या नारळामध्ये पीठ आणि साखरेचे मिश्रण भरावे. व नंतर हा सुका नारळ एखाद्या निर्जन ठिकाणी घेवून जाऊन तेथे पुरावा. पण लक्षात ठेवा की, नारळाच्या छिद्राचा भाग हा जमिनीच्या वरच राहिला पाहिजे. आणि हा उपाय केल्यावर घरी पोहोचेपर्यंत मागे वळून पाहू नये किंवा कोणाशीही बोलू नये, या उपायामुळे शनी दोष समूळ समाप्त होण्याबरोबरच, आपल्या जीवनातील हर प्रकारची संकटे संपून जातील

तर मित्रानो हे होते आमवास्येदिवाशी करायचे काही अद्भूद आणि चमत्कारिक उपाय. हे उपाय आपण आमावस्ये दिवशी करून आपल्या जीवनातील हर तर्हेच्या समस्येतून आपली सुटका करून घेवू शकता. हे उपाय अत्यंत चमत्कारिक असून फारच शीघ्रगतीने परिणाम देणारे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्याने निवारण करण्यासाठी आपण हे उपाय अवश्य करावेत, पण उपाय करताना कसल्याही प्रकारच्या शंका-कुशंका मनामध्ये आणू नयेत. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठेने आपण हे उपाय करावेत. म्हणजे या उपायांचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. हे उपाय तांत्रिक उपाय असल्या कारणाने, निश्चितच अगदी शीघ्र गतीने आणि अचूक परिणाम देणारे उपाय आहेत. या उपायांच्या प्रभामुळे आपल्या जीवनातील समस्या संपून जातील, व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनून आपल्याल जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यांची निश्चितच प्राप्ती होवून जाईल व आपण यशस्वी बनाल. तर मित्रानो आमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय नक्की करा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This