Tuesday, May 17, 2022

Basant Panchami 2022 | शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ वसंत पंचमी स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक चंदनाचे लाकूड इथे ठेवा.

Must Read

Basant Panchami 2022 | शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ वसंत पंचमी स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक चंदनाचे लाकूड इथे ठेवा.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो, हिंदू धर्मानुसार माघ महिन्यामधील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी हि वसंत पंचमी म्हणून साजरी केली जाते. विद्या आणि कलेची देवी सरस्वती मातेचे या दिवशी पूजन केले जाते. यावर्षी वसंत पंचमीचा सण 5 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी साजरा केला जाणार आहे. शास्त्रानुसार माता सरस्वतीचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता.

धार्मिक मान्यतांनुसार, वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने शिक्षणाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, तसेच जीवनामध्ये सुख-समृद्धी प्राप्त होते. विशेषत: या दिवशी विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीचे पूजन केले पाहिजे.

मित्रानो यावर्षी ही वसंत पंचमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवारच्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी असणार आहे. वसंत पंचमीच शुभ मुहूर्त हा 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:47 वाजता सुरू होईल, व दुसऱ्या दिवशी 6 फेब्रुवारी, रविवार रोजी पहाटे 03:46 वाजता समाप्त होईल. वसंत पंचमीची पूजा सूर्योदयानंतर आणि दुपारच्या आधी केली जाते.

चला तर मग जाणून घेवूया वसंत पंचमीच्या शुभ मुहुर्तामध्ये करायच्या उपायांविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.
मित्रानो वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.

वसंत पंचमीच्या दिवसापासून वसंत ऋतु सुरू होतो. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते.

मित्रानो वसंत पंचमी ही सर्व शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असल्याचे मानले जाते. या दिवशी जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणे हा सरस्वती पूजनाचा उद्देश आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचे पूजन करण्यासाठी, आपल्या घरातील देव्हार्यासमोर किंवा जिथे कोठेही आपल्याला योग्य वाटेल अश्या आपल्या घरातील खोलीमध्ये एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर, टेबलावर माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्टेपन करावा, त्यानंतर त्यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर एक कलश स्थापित करावा. यानंतर सर्वप्रथम श्रीगणेशाचे नाव घेऊन पूजा सुरु करावी. माता सरस्वतीचे पूजन करताना, सर्वप्रथम तिची प्रार्थना करावि. मातेला पिवळी फुले किंवा पिवळ्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात, पूजनाच्या वेळी शक्यतो आपण पांढरी वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर माता सरस्वतीचा पूर्ण श्रृंगार करावा. मातेच्या चरणी गुलाल अर्पण करावा. सरस्वती मातेला पिवळी फळे किंवा हंगामी फळांच्या बरोबर पिवळी बुंदी अर्पण करावि. सरस्वती मातेला मालपुआ आणि खीर यांचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या वेळी अभ्यासाचे साहित्य जसे पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल इत्यादी माता सरस्वतींच्या चरणाजवळ ठेवावीत. शंख नाद किंवा घंटा नाद करावा.

या दिवशी माता सरस्वतीसह श्री गणेश, सूर्यदेव, भगवान विष्णू आणि शिव यांचे पूजन देखील केले पाहिजे.माता सारास्वतीना पिवळी फुले आणि पिवळ्या फुलांचे हार, हळद कुंकू आणि शृंगाराचे साहित्य मातेला अर्पण करावेत. वसंत पंचमीच्या दिवशी आईच्या चरणी गुलाल अर्पण करण्याचा विधी आहे.

मित्रानो, वसंत पंचमीचा दिवस विवाहाच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अबुजा मुहूर्त असतो. म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी कोणताही विवाह बिनदिक्कत करता येतो. यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडून शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते.

मित्रानो या दिवशी काही खास उपाय करून राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळविता येते.
ज्या लोकांच्या जीवनामध्ये राहूची महादशा किंवा अंतरदशा चालू आहे, त्यांनी माता सरस्वतीचा हा उपाय अवश्य करावा, अशा लोकांनी देवी सरस्वतीची पूजा केल्यानंतर गुग्गल म्हणजेच उद आणि कापराची धुनी माता सारास्वतीना ध्यावी व मिठाईचा प्रसाद वाटावा जी मुले तोतरे बोलतात किंवा ज्या मुलांना बोलताना तोतरेपणाचा त्रास होतो अथवा ज्या मुलांना नीट बोलता येत नाही, अशा मुलांनी बासरीच्या एका छिद्रामध्ये मध टाकून उरलेली छिद्रे मेणाने भरावीत, व त्यानंतर हि बासरी जमिनीमध्ये गाडावी. या उपायामुळे त्याची तोतरे बोलण्याची समस्या दूर होते.

मित्रानो जर का आपल्याला जीवनामध्ये पुन्हा पुन्हा अपयश येत असेल, तर अशा स्थितीमध्ये या दिवशी माता सरस्वतीच्या फोटोची पूजा करावि आणि आपल्या ऑफिस किंवा घराच्या मुख्य दरवाजावर पांढर्या चंदनाचा टिळक लावावा.
जर का आपली मुले कुश्ग्र बुद्धिमत्तेची नसतील,तर अशा स्थितीमध्ये श्वेत चंदनाचे दोन दाणे घेऊन, देवी सरस्वतीची पूजा केल्यानंतर हे दोन्ही दाणे मुलाच्या उजव्या हातात निळ्या धाग्याने बांधावेत. या उपायामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होईल.
मित्रानो जर का आपल्या घरामध्ये एकादी व्यक्ती सतत आजारी असेल, तर अशा वेळी एक नारळ घेऊन, थोडी पांढरी मिठाई सरस्वती मातेला अर्पण करावी व यानंतर हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावा. या उपायामुळे आजारी व्यक्तीला रोगापासून मुक्ती मिळेल.

मित्रानो एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी अथवा आगामी काळामध्ये आपल्याला कोणत्याही स्पर्धेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करायची असेल आणि त्यात यश मिळवायचे असेल, तर वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि हिरवे वेलदोडे आणि दुधापासून बनविलेलेई मिठाई मातेला अर्पण करावि. भोग अर्पण करालेल्यानंतर त्यातील, वेलदोडे काढून पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये, पूजेच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या खोलीत अथवा टेबलावर ठेवावेत, आपल्याला निश्चितच यश प्राप्त होईल.

मित्रानो माता सरस्वतीच्या कृपेशिवाय लक्ष्मी कधीही आपल्याजवळ स्थिर स्थितीत राहू शकत नाही, यासाठी आपण दोन पांढर्या चंदनाची लाकडे घेऊन त्यांची विधिपूर्वक पूजा करावि आणि 108 वेळा || ओम ह्रीं सरस्वतैय नमः || या मंत्राचा जप करावा, त्यानंतर एक पांढर्या चंदनाचे लाकूड लाल कपड्यात गुंडाळावे. आणि आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावे व यानंतर आपल्या गुरु महाराजांना दक्षिणा द्यावि, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत कि माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता सरस्वतीच्या पाठीशी सदैव राहील.व दुसरे चंदनाचे लाकूड आपण उगाळून टीका लावण्यासाठी वापरावे.

मित्रानो आपले आपल्या कुटुंबियांशी कुटुंब तसेच मित्र परिवाराशी संबंद चांगले यासाठी आजच्या दिवशी पिवळा तांदूळ, चंदन, गुलाल, अत्तर पिवळ्या कपड्यात बांधून पुजारी किंवा गुरु महाराज किंवा ब्राह्मण यांना दान करावे, या उपायामुळे सर्वांशी आपले नाते संबंध मधुर राहतात.

तर मित्रानो वसंत पंचमीच्या दिवशी आपण हा उपाय नक्की करा.या उपायांमुळे आपल्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण होतील व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होवून जाईल.विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This