गणेश जयंती शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ आर्थिक संकटामध्ये आहात? गणपती बाप्पांच्या समोरील हि वस्तू गाईला खायला घाला.
नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो तसे पाहता गणपती बाप्पांचे अनुयायी दर-रोजच त्यांचे स्मरण करत असतात, परंतु वर्षातील काही दिवस हे फारच विशेष आणि महत्वाचे असतात. या दिवसांमध्ये गणपती बापांची उपासना केल्याने, गणपती बाप्पांचे श्रद्धा पूर्वक आणि भक्तिभावाने पूजन केल्याने, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि यातीलच एक अतिमहत्त्वाचा दिवस म्हणजे, माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी गणेश चतुर्थी. हिंदू कॅलेंडर नुसार हा दिवस गणेश जयंतीच्या रुपामध्ये साजरा केला जातो. यावर्षी शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. तसे तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी साजरी केली जाते, परंतु हि चतुर्थी तिथी फारच विशेष आणि अत्याधिक महत्वाची मानली जाते, कारण हिंदू महिन्यामधल्या, सर्वात पावन महिना समजल्या जाणार्या माघ महिन्यामध्ये हि चतुर्थी साजरी केली जाते. आणि म्हणून या चतुर्थीला माघी गणेश चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते. तर मित्रानो या गणेश जयंतीच्या पावन पर्वामध्ये काही विशेष प्रकारचे पूजन आणि उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण करून घेता येतात, धनप्राप्ती मध्ये येणाऱ्या समस्यांचे निवारण करू शकतो. चला तर मग जाणून घेवूया या दिवशी करायच्या काही खास आणि चमत्कारिक अशा उपायांविषयी.
पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.
मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.
मित्रानो, प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय असलेल्या गणेशाचे पूजन केल्याने, आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होवून जातो. गणेश जयंतीच्या पावन दिवशी गणपती बाप्पांचे विशेष षोडशोपचार पद्धतीने पूजन केल्याने श्रीगणेश प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय केलेत, तर एकदंत लंबोदर सहज प्रसन्न होतात, व आपल्यावर कृपाशीर्वाद बरसवितात.
मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त झाल्यानंतर शुचिर्भूत होवून आपल्या घरातील मंदिरामध्ये किंवा एखाद्या गणेश मंदिरामध्ये जावून गणपती बाप्पांचा शुद्ध जलने अभिषेक करावा. यानंतर त्यांच्या समोर बसून अथर्व शीर्षाचा पाठ करावा. गणपती बापानं मावा मिश्रित पिवळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवाव, व हा लाडूचा नैवेद्य सर्व गणेश भक्तांना वाटावा.
मित्रानो यंत्रशास्त्रानुसार गणेश यंत्र हे अत्यंत चमत्कारीक यंत्र आहे. आणि म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्ये त्याची आवर्जून स्थापना करावि, अथवा आपल्या घरामध्ये आधीपासूनच गणेश यंत्र स्थापित असल्यास या दिवशी गणेश यंत्राचे जल, दुध इत्यादीने अभिषेक करून त्याचे विधिवत पूजन करावे म्हणजे हे यंत्र पुन्हा रिचार्ज होईल. मित्रानो या यंत्राची स्थापना आणि पूजन केल्याने जीवनामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होतो. हे यंत्र घरामध्ये स्थापित असल्याने घरामध्ये कसल्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.
मित्रानो, गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये असणारे हर तर्हेचे संकट समूळ संपवून टाकण्यासाठी हत्तीला हिरवा चारा खायला घालावा. जर का आपल्या आजूबाजूला एखाद्या मंदिरमध्ये किंवा मठामध्ये हत्ती नसेल तर आपण पांढर्या रंगाच्या देशी गाईला यादिवशी चारा खायला घालावा.
व गणेश मंदिरामध्ये जाऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करावी. या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये असणार्या हर प्रकारच्या समस्येचे, हर तर्हेच्या संकटाचे निवारण होवून जाईल. व गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होवून जाईल.
मित्रानो, आपण जीवनामध्ये धनाच्या समस्येने ग्रासला असाल, पैसे मिळण्यामध्ये वारंवार, सातत्याने अडथळे निर्माण होत असतील, कितीही प्रयत्न केला तरी नियमित पैसे मिळण्याचे मार्ग मिळत नसतील, असलेले पैसे विनाकारण, नाहक या न त्या मार्गाने खर्च होवून जात असतील, पैशांची अत्यंत निकड असून देखील, म्हणावे तितके पैसे मिळत नसतीlल, रोजचा खर्च निभावणे देखील कठीण होवून गेले असेल व अश्या परिस्थितून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल, तर गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी
स्नानादी नित्यकर्म आटोपून झाल्यानंतर, शुचिर्भूत होवून आपल्या घरातील मंदिरासमोर बसावे. व गणपती बाप्पांच्या समोर एक दिवा प्रज्वलित करावा, व यानंतर त्यांना थोडा गुळ व तूप यांचा नैवेध्य दाखवावा. यानंतर काही वेळाने हा गुळ आणि तुपाचा नैवेद्य एखाद्या गाईला खायला घालावा. या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्यांचे निवारण होवून जाईल.
मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पिवळ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापित करावि व || श्री गणाधिपतये नम: || या गणपती बाप्पांच्या मंत्राचा उच्चार करत, गणपती बाप्पांना पाच हळदीच्या गाठ अर्पण कराव्यात. यानंतर 108 दुर्वा घेवून, या दुर्वांच्यावर ओली हळद लावावी. म्हणजे थोडी हळद घेवून त्यामध्ये पाणी मिसळून, हा हळदीचा घोळ दुर्वाना लावावा.
व || श्री गजवकत्रम् नमो नम: || या मंत्राचा चा उच्चार करत या हळद लावलेल्या १०८ दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात.
तसेच मित्रानो गणेश जयंतीला घरामध्ये दुर्वाचा गणपती बनवून पूजन केल्याने देखील फारच लाभ प्राप्त होतात. घरामध्ये दुर्वांपासून गणेशाची मूर्ती बनवून स्थापित करावी, या दुर्वांच्या गणपती बाप्पांना मोदक, गूळ, फळे, मावा-गोड पदार्थ इ. नैवेद्य अर्पण करवा. या उपायामुळे गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व मनोकामना, सर्व प्रकारची मनोरथे, सर्व इच्छित कार्ये जलद गतीने पूर्ण व्हायला लागतात.
मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करावा व संध्याकाळी घरामध्ये गणपती अर्थशीर्षाचे पठण करावे. गणपती बाप्पांना तिळाचे लाडू अर्पण करावेत.
तर मित्रानो हे होते गणेश जयंतीच्या पावन दिवशी करायचे काही अति विशेष आणि चमत्कारिक उपाय. हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील हर प्रकारच्या समस्येचे निवारण होवून जाईल व आपले जीवन धन धान्याने भरून आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी आपण हे उपाय नक्की करा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.