नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दोरीने बांधूल्याने ती व्यक्ती असहायय बनते व ती व्यक्ती काहीही करू शकत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला, किंवा घर-परिवाराला, कुटुंबाला, त्या व्यक्तीच्या व्यवसायाला, व्यापाराला अदृश्य शक्तीने, जादूने बांधली गेली, तर त्या व्यक्तीला जाणवते कि आपली प्रगती खुंटली आहे. आपण आणि आपले कुटुंब संकटामध्ये आहे. यामध्ये घरातील वाद, व्यवसायात तोटा, नोकरी गमावणे अशी अनेक संकटे असू शकतात.
आणि याची जाणीव आपल्यातील प्रत्येकाला होत असते. अनेकांना कोणीतरी आपल्याला बांधल्यासारखे वाटत असते, कोणीतरी आपल्या कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करत असल्याचे भासत असते. काही लोक कोणाच्या तरी दबावाखाली तर काही कोणाच्या तरी प्रभावाखाली जगत असतात. काही लोकांना असे वाटते की, इतके काम करूनही त्याचे योग्यफळ मिळत नाहीये. त्यांना असे वाटते की कोणीतरी आपली प्रगती रोखली आहे.
आपण बंदिवासातील जीवन जगात नाही आहोत, तरी देखील आपण कोणत्या ना कोणत्या बंधनात राहत असल्याचे वारंवार जाणवत असते. काही वेळेला आपल्यावर न्यायालयात खटले दाखल केले जातात, तर काहींवेळेला आपण कर्जाच्या डोंगराखाली दाबून जातो. अशा परीस्थितीमध्ये जीवनाला जणू कोणीतरी बांधून चपराक दिली आहे असे वाटते. व या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही. तर मित्रानो अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता, यातून बाहेर पडण्याचे व बंधनातून मुक्त होण्याचे 10 अत्यंत चमत्कारिक उपाय आम्ही तुम्हाला या विदेओमध्ये सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया या १० चमत्कारी आणि अत्यंत प्रभावशाली उपायांविषयी.
पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.
मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.
पहिला उपाय – कैद पक्ष्यांना पिंजर्यातून मुक्त करा
मित्रानो जर का आपल्याला, कोणीतरी व्यक्ती एखादा पक्षी पिंजऱ्यातून घेवून जाताना, किंवा पक्षी पिंजऱ्यात असल्याचे पहावयास मिळाले, तर आपण त्या पक्ष्यांना विकत घेऊन, त्यांना पिजार्यातून मोकळे करावे. या उपायामुळे आपल्यावर जे काही ऋण असेल, जे काही कर्ज असेल, तर त्या कर्जाच्या बोज्यातून आपली मुक्तता होईल, आपले कर्ज फिटून जाईल. व जर का आपल्याला पक्षी पाळण्याचे शौकीन असाल, आणि आपण आपल्या घरामध्ये पक्षी पिंजऱ्यात ठेवला असेल, तर भलेही आज तुमच्यावर कसले कर्ज नसेल पण भविष्यात आपल्यावर भयंकर कर्जाचा बोजा अडू शकतो.
दुसरा उपाय – एकादशी आणि प्रदोष व्रत करा.
मित्रानो आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहांचे अशुभ प्रभाव टाळण्यासाठी, एकादशी आणि प्रदोष (त्रयोदशी) व्रत सर्वात फलदायी करत आहेत.
हिंदू धर्मामध्ये एकादशी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करण्यामागील शास्त्र असे आहे की, ते आपल्या कुंडलीतील राहू, चंद्र आणि शनी ग्रहाचे वाईट प्रभाव दूर करतात, आणि या ग्रहांपासून मिळणार्या शुभ फळांमध्ये त्यांचे शुभ रुपांतर करतात. मित्रानो प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्ष मध्ये येणाऱ्या ग्यारस आणि त्रयोदशीला जर का आपण हे व्रत केलेत, तर आपल्यावर तंत्र-मंत्र, काळी जादू यासारख्या माध्यमातून केल्या गेलेल्या बंधनातून आपण मुक्त व्हाल, हि बंधने हळूहळू संपुष्टात येतील.
तिसरा उपाय – हनुमान चाळीसेचा पाठ करावा.
मित्रानो आपण दररोज न चुकता हनुमान चालिसेचा पाठ केला पाहिजे. अथवा मंगळवार किंवा शनिवार च्या दिवशी भगवान हनुमान्तांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे पूजन करावे व त्यांना लाल रंगाच्या त्रिकोणी ध्वजावर श्री राम लिहून अर्पण करावे, तसेच पिंपळाच्या पानावर थोडा अष्टगंध ठेवीन हनुमान्तांना अर्पण करावा.
मित्रानो तंत्र-मंत्र, काळी जादू यासारख्या बंधनातून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हनुमान्तांची भक्ती होय. आपण हनुमान्तांचे भक्त झाल्यास जीवनामध्ये कधीहि आपल्याला तंत्र-मंत्र, काळी जादू यासारखी बंधने जाणवणार नाहीत.
चौथा उपाय – कुलदेवी व कुलदेवता यांची उपासना करा
मित्रानो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बर्याच परिवारांना त्यांच्या कुलदेवता आणि कुल देवी यांच्या स्थानाविषयी काहीच माहिती नाहीये. आपले पूर्वज हे कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या स्थानावरून ओळखले जातात.
तर मित्रानो कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या च्या ठिकाणी जाऊन एक संपूर्ण लिंबू घेवून, तो लिंबू स्वतःवरून 21 वेळा उतरवावा, लिंबू उतरवून झाल्यानंतर त्या लीम्बुचे दोन भाग करावेत, आणि देवाकडे तोंड करून उभे राहून उजव्या हातातील अर्धा लिंबू डाव्या हाताच्या दिशेला व डाव्या हातातील लिंबू उजव्या हाताच्या दिशेला फेकून द्यावेत. यानंतर कुलदेवी किंवा कुलदेवतेकडे क्षमा प्रार्थना करून देवी किंवा देवतेच्या मंत्राचा किंवा स्त्रीत्राचा पाठ करावा. अथवा कुलदेवी किंवा कुलदेवतेचे विधिवत पूजन करून याथाशक्ती दान धर्म करावा.
पाचवा उपाय – व्यक्तिगत बंधनातून मुक्ती मिळण्यासाठी.
मित्रानो आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये अडथळ्याचा सामना करावा लागत असेल, आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अपयश येत असेल, तर यासाठी मूठभर सेंधे मीठ घेवून, सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळी हे सेंधे मीठ आपल्या डोक्या वरून तीन वेळेला उतरवावे व दरवाजाच्या बाहेर फेकून द्यावे. हा उपाय सलग तीन दिवस करावा. तीन दिवस करू देखील समाधान मिळत नसेल, तर एक मुठ सेंधे मीठ डोक्या वरून तीन वेळेला उतरवून हे मीठ टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करावे. नक्कीच फायदा होईल.
उपाय सहावा – फळांचे दान करावे.
मित्रानो पाच ते सात प्रकारची फळे घेऊन, ती मंदिरामध्ये ठेवावीत. आपल्या मदतीसाठी व बंधनातून मुक्तीसाठी देवाला प्रार्थना करावि. पाच मंगळवार किंवा गुरुवारी हा उपाय केल्यास बंधनातून मुक्तता मिळेल.
सातवा उपाय – पैश्यांच्या नाण्यांचा उपाय.
मित्रानो जेंव्हा देखील आपण एखाद्या मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये जाल, तेव्हा अंत्यविधी नंतर परत येताना थोडी नाणी आपल्या डोक्यावरून पाठीमागच्या बाजूला फेकून द्यावीत. हि नाणी फेकताना किंवा फेकल्यानंतर मागे वळून पाहू नये. यामुळे आपल्याला जीवनामध्ये दैवी मदत मिळू लागेल व सर्व प्रकारच्या आपण बंधनातून मुक्त व्हाल.
आठवा उपाय – काळ्या जादूच्या बंधनापासून मुक्ती मिळविण्याकरिता.
मित्रानो जर का आपल्याला असे वाटत असेल की, कोणीतरी आपल्यावर काळी जादू केली आहे, किंवा आपल्या घराच्या प्रगतीला बांधले आहे, तर या पूजेने त्या काळ्या जादूचा प्रभाव संपून जातो. मित्रानो तंत्रशास्त्रामध्ये काळी हळद, शंख, रत्न, बांदा, फळझाड, एकमुखी नारळ, गाई इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. बांदा म्हणजे एखादे झाड जमिनीवर न उगवता अशोक, पिंपळ, डाळिंब, वड, उंबर, आवळा किंवा पारिजाताच्या वृक्षावर उगवते. तर मित्रानो तंत्राशास्त्रामध्ये या सर्वांचे विशेष महत्त्व आणि उपयोग आहेत. या सर्व चमत्कारिक गोष्टी आहेत. अशीच एक चमत्कारिक वनस्पती म्हणजे पांढरा आकाडा, ज्याला आपण पांढर्या रुईचे झाड असे देखील म्हणतो. ही एक अद्भुत वनस्पती आहे. ज्या घरामध्ये त्याची स्थापना केली जाते, तेथे कोणत्याही प्रकारचे तंत्र-मंत्र किंवा जादूटोणा यांचा प्रभाव पडत नाही.
उपाय नववा – लक्ष्मी बंधन मुक्ती
मित्रानो जर का आपण हा उपाय करू शकत नसाल, तर दररोज दोन लाकडी अगरबत्ती (बांबूच्या नव्हे) अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती देवी महाकालीसाठी लावाव्यात. व दर शुक्रवारी महाकालीच्या मंदिरात जाऊन महाकालीचे पूजन करावे.
बर्याच वेळेला चांगला चालणारा व्यवसाय किंवा दुकान अचानक ठप्प झाल्याचे आपण पाहतो. पैशाची आवक थांबली आहे, दैनंदिन गरजा भागवणे देखील कठीण झाले आहे. ही समस्या केवळ व्यावसायिकांसाठीच नाही तर नोकरी करणाऱ्यांनाही आहे.
तर यासाठी दोन्ही पक्षातील म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अष्टमीला किंवा कोणत्याही शुक्रवारी एखाद्या लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरावे व त्यावर माता महाकालीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावि. पाटाच्या किंवा चौरंगाच्या चारही कोपऱ्यांवर काळ्या अखंड उडदाच्या दाण्यांचे चार ढीग करून त्या चारही ढिगावर एक- एक छोटा नारळ ठेवावा.
महाकाली मातेसमोर काळी उडीद आणि तांदूळ एकत्र करून, त्याचे पाच ढीग करावेत व या पाचही उडीद आणि तांदळाच्या ढीगावर तीन-तीन काळ्या हळदीच्या गाठ आणि दोन-दोन गोमती चक्र ठेवावेत.
यानंतर या पाच उडद आणि तांदूळ मिश्रित ढिगाच्या पुढे एक तीन मुठ अखंड तांदळाचा ज्याला आपण अक्षत म्हणतो, तर अश्या अखंड तांदळाचा ढीग करावा व एक सव्वा मुठ काळ्या उडदाचा ढीग करावा. अखंड तांदळाच्या ढीगावर सियार सिंगी आणि काळ्या उडदाचा ढीगावर हत्था जोडी स्थापित करावी. चमेलीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. गणेश पूजनानंतर महाकाली मातेची पंचोपचार पूजा करावी. चंदनाचा धूप किंवा धुनी दाखवावी. आईला खीर अर्पण करावी. अशा प्रकारे कोणत्याही जाणकार व्यक्तीला विचारून 10 दिवस महाकाली देवीची पूजा करावी. या उपायामुळे आपल्या सर्व समस्या संपून जातील.
उपाय दहावा – बंधन मुक्ती कवच
मित्रानो कधी कधी आपण, अचानकपाने इतक्या मोठ्या संकटामध्ये, समस्यांमध्ये अडकतो की आपल्याला काहीच समजत नाही. काही वेळेला याचे कारण असे असते की, ती व्यक्ती भूत-प्रेत, नजर बाधा किंवा कोणत्याही दुष्ट आत्म्याच्या जाळ्यात अडकते. अशा बिकट परिस्थितीत ज्योतिषशास्त्रीय साहित्य धारण केल्याने किंवा पूजा केल्याने नक्कीच फायदा होतो.
यासाठी बाधा मुक्ती कवच वाईट नजर बाधे पासून आपले संरक्षण करते. तंत्र-मंत्र-जादू, जादूटोण्याचे दुष्परिणाम कमी करते आणि विशेषतः शनिदोष, साडेसती, धैय्या या हे उपाय काळात शुभ परिणाम प्राप्त करून देतात. त्याच्या चमत्कारीक प्रभावामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढते तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो व आपल्याला सकारात्मकता आणि प्रगतीकडे घेऊन जातो.
तर मित्रानो तंत्र-मंत्र, काळी जादू यासारख्या बंधनातून मुक्ती मिळविण्यासाठी आपण हे उपाय अवश्य करा. व आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न बनवा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.