Wednesday, May 18, 2022

maghi purnima 2022 | १६ फेब्रुवारी २०२१ – माघी पोर्णिमा – एक वडाचे पान या विधीने वाहा

Must Read

१६ फेब्रुवारी २०२१ – माघी पोर्णिमा – एक वडाचे पान या विधीने वाहा

आर्थिक समस्या, शनी दोष, भाग्योदय मनोकामना पूर्ती

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो पौराणिक मान्यतांनुसार पौर्णिमेचा दिवस हा दैवीय दिवस मानला जातो. या दिवशी केल्या गेलेल्या दान धर्माचे, पुण्य कर्मांचे फळ हे व्यक्तीला इतर दिवसांमध्ये केल्या गेलेल्या दान धर्माच्या, पुण्या कर्मांच्या फळाच्या तुलनेत ३२ पटींनी अधिक मिळते. मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन तसेच माता तुलशींचे पूजन केल्याने महालक्ष्मी मातेंची कृपा तर प्राप्त होते.

मित्रानो माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणार्या पौर्णिमेला माघी पोर्णिमा असे म्हंटले जाते. यावर्षी हि शुभ तिथी बुधवार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी आहे. बर्याच धर्म ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये असा उल्लेख आढळतो कि सत् युगापासून कलयुगा पर्यंतच्या सर्व युगांमध्ये माघ पोर्णिमा हि अत्यंत महत्व पूर्ण मानली गेली आहे. माघ महिना हा कार्तिक महिन्या प्रमाणेच पुण्यादाई आणि दुखातून सुटकारा मिळवून देणारा महिना आहे. मित्रानो माघ महिन्यामध्ये भगवान हरी विष्णू हे जलामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये निवास करतात. तसेच माघ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्य दिवशी देवता देखील देवलोकातून पृथ्वीवर येवून पवित्र नद्यांमध्ये व संगमांमध्ये स्नान करतात, याचे कारण असे आहे कि या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. आणि म्हणून सूर्योदयाच्या वेळी स्नान करण्यामुळे रोग व पाप यांचा क्षय होतो.

मित्रानो यावर्षी माघ पोर्णिमा १६ फेब्रुवारी २०२१ रोजी बुधवारच्या दिवशी आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सर्वार्थ सिद्धी योग देखील बनत आहे. यामुळे यादिवशी सूर्योदयापूर्वी उठून, स्नानादी नित्यकर्म आटोपून भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे, तसेच या दिवशी कंबल, तीळ, तेल, गहू, वस्त्र, बूट, इत्यादी वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ फलदायी असते. चलातर तर मग जाणून घेवूया पौर्णिमेच्या दिवशी करायच्या उपयाविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल

मित्रानो जर का आपल्याला जीवनानाम्ध्ये वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, सातत्त्याने आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, विनाकारण छोट्या छोट्या कामाना देखील विलंब होत असेल, वारंवार असफलतेचा सामना करावा लागत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करावा. मित्रानो तंत्र शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय करून आपल्या जीवनातील शनी दोष संपवू शकता. या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला किंवा काळ्या रंगाच्या गाईला रोटी किंवा चपाती अवश्य खायला घालावी. याचा बरोबर काळ्या मुंग्यांना थोडे गव्हाचे पीठ आणि साखर मिसळून खायला घालावी. या दिवशी तेलामध्ये तळलेल्या किंवा तेला पासून बनविलेल्या पदार्थांचा शनी देवाना भोग लावावा व हे पदार्थ गरीब, गरजू लोकाना दान करावेत. कारण शनिदेव हे गरीब आणि गरजू लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या उपायामुळे शनिदेव प्रसन्न होतात व आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात. आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संपून जातील, व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

पैशांशी संबंधित अडचणींचा सामना करत असाल

मित्रानो जर का आपण पैशांशी संबंधित अडचणींचा सामना करत असाल, तर पौर्णिमेच्या दिवशी आपण चार लवंगा आणि एक लाल रंगाचे छोटेसे कापड घ्यावे. यानंतर आपल्या घरातील देवार्यामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचे स्मरण करत एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व या दिव्यामध्ये २ लवंगा टाकाव्यात. यानंतर उरलेल्या २ लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मींच्या समोर ठेवून श्रद्धापूर्वक लक्ष्मी मातेंचे पूजन करावे. पूजन पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्त्रोत्राचा किंवा श्री सूक्ताचा पाठ करावा. पाठ करून झाल्यानंतर लाल कपड्यामध्ये बांधलेल्या लवंगा घेवून आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवाव्यात. या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्या संपून जातील.

मनोकामनांची पुरती करायची असेल

मित्रानो जर का आपल्याला आपल्या मनोकामनांची पुरती करायची असेल, आपले इच्छित कार्य पूर्ण करायचे असल्यास, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या उंची इतके लाल रंगाचे रेशमी सुत किंवा धागा घ्यावां. यानंतर वडाच्या झाडाचे एक पान घेवून ते स्वच्छ धुवून, कपड्याने पुसून घ्यावे. यानंतर एक कोरा कागद घेवून, त्या कागदावर लाल रंगाच्या पेनाने आपले मनोकामना लिहावी व या कागदाची अश्या पद्धतीने घडी घालावी कि आपली इच्छा आतील भागामध्ये राहील. यानंतर हा कागद वडाच्या पानावर ठेवून लाल रंगाच्या रेशमी धाग्याने बांधावा. व हे वडाचे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे. या उपायामुळे आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतीलच शिवाय आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या बधांपासून आपल्याला मुक्ती मिळेल.

शनी ढय्या आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी

याच बरोबर मित्रानो शनी ढय्या आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी लाल मिरचीचे सेवन करू नये. या दिवशी जेवण बनविताना लाल मिरची ऐवजी काळ्या मिरीचा व काळ्या मिठाचा वापर करावा. या उपायामुळे आपल्याला शनी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या जीवनातील शनी ढय्या आणि साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी होवून जातो.

भाग्याची साथ मिळण्यासाठी

मित्रानो भाग्याची साथ मिळण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी डाळिंबीच्या वृक्षाची एक फांदी घेवून त्याची लेखणी तयार करावी. यानंतर लाल रक्त चंदन उगाळून किंवा लाल रक्त चंदनाच्या पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची शाई तयार करावी. यानंतर डाळिंबीच्या लेखणी घेवून लाल रक्त चंदनाच्या शाईने भोज पत्रावर “ ॐ ह्रीं ” हा मंत्र लिहावा व या बोज पत्राची दर रोज पूजा करावी. या उपायामुळे आपले भाग्य आपल्याला साथ दयायला लागते. आपल्या नोकरीच्या किंव्या उद्योग धंद्याच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या पासून मुक्ती मिळते. आपल्यामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

तर मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनातील समस्यांचे निवारण करण्यासाठी, आपल्या मनोकामनांची पुरती करण्यासाठी, आपल्या जीवनातील धनाशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी आपण उपाय अवश्य करावेत. य उपायांच्या प्रभावाने आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न होवून जाईल. उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाईल. तर मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी आपण हे उपाय नाकी करा, विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This