षटतिला एकादशी – शुक्रवार 28 जानेवारी २०२२
पाच लाल रंगाची फुले इथे ठेवा, धनाचा वर्षाव होईल. Shattila Ekadashi 2022
नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशी म्हणून ओळखले जाते, यावेळी ही शुभ तिथी शुक्रवार, 28 जानेवारी रोजी आहे. पद्मपुराणात सांगितले आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते व त्यांना तिळ अर्पण केले जातात. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी आपण जितके जास्त तिळाचे दान केले जाते तितके आपल्याला, आपल्या पापांपासून मुक्ती मिळते.
पौराणिक मान्यतेनुसार षटतिला एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो. यादिवशी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करण्याबरोबरच, तिळाचे दान, तर्पण आणि तिलानेच भगवान श्री लक्ष्मी नारायणांचे पूजन केले जाते. यादिवशी तिळाचा अनेक प्रकारे प्रयोग करण्यामुळेच, या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हंटले जाते. एकादशी तिथी हि भगवान विष्णुना अत्यंत प्रिय आहे, तसेच २८ जानेवारी २०२२ रोजी येणारी षटतिला एकादशी हि शुक्रवारच्या दिवशी येत असल्याने ती माता लाक्ष्मींशी देखील संबंधित आहे.
मित्रानो, ज्योतिषीय दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास, शुक्रवारी येणारी एकादशी हि फारच शुभ मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मीना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केले, तर आपल्या जीवनामध्ये धनलाभाचे योग बनतात. जर का हे उपायांना आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केले, तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्यावर व आपल्या कुटुंबावर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनाला धन-धान्याने परिपूर्ण बनवून, आल्याला ऐश्वर्य संपन्न बनवतील.
चला तर मग जाणून घेवूया षटतिला एकादशीच्या दिवशी करायच्या काही विशेष उपायांविषयी. पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.
मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.
मित्रानो, षटशतीला एकादशी तिथीचा प्रारंभ गुरुवार २७ जानेवारी २०२२ रोजी रात्री ०२:१६ मिनिटांनी होईल व एकादशी समाप्ती २८ जानेवारी २०२२ रोजी ११:३५ मिनिटांनी होईल, त्यामुळे २८ जानेवारी शुक्रवारच्या दिवशी षटशतीला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. एकादशी पारण वेळ शनिवार २९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०७:११ मिनिटांपासून ०९:२० मिनिटांपर्यंत असणार आहे.
मित्रानो २८ जानेवारी शुक्रवारच्या दिवशी, संपूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्र असणार आहे. शुक्रवारच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र असल्या कारणाने, या दिवशी चर नावाचा योग बनत आहे. याशिवाय ग्रहांच्या युतीतून ध्रुव योग देखील बनत आहे. आणि हे दोनही योग अत्यंत शुभ मानले जातात. या योगांमध्ये केल्या गेलेल्या उपायांचे, पूजनाचे फारच विशेष असे महत्व असते. तर मित्रानो अशा या दुर्मिळ अश्या योगामध्ये कोण कोणते उपाय आपण केले पाहिजेत कि ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लाक्ष्मिनाचा स्थिर निवास होईल व आपले जीवन धन धान्याने भरून जाईल.
मित्रानो, षटतिला एकादशीच्या दिवशी माता लाक्ष्मींच्या मंदिरामध्ये जावून, त्यांना लाल रंगाची वस्त्रे अर्पण करावीत. शक्य असेल तर माता लक्ष्मीना शृंगाराचे साहित्य, जसे कि लाल रंगाच्या टिकल्या, कुंकू, लाल रंगाची चुनरी, लाल बांगड्या इत्यादी अर्पण कराव्यात. या उपायामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या परिवारावर कृपाशीर्वाद बरसवतात. तसेच या दिवशी माता लाक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपणही लाल रंगाची वस्त्रे परिधान करावीत. या दिवशी करायचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे जर का आपल्याला बाकी काहीच जमले नाही, तर किमान पाच लाल रंगाची फुले घ्यावीत. हि लाल रंगाची फुले आपल्या हातामध्ये धरून, आपल्या घरतील लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा प्रतिमेसमोर बसावे, अथवा माता लाक्ष्मींच्या मंदिरामध्ये जावून त्यांच्या मूर्तीसमोर, हातामध्ये पाच लाल रंगाची फुले घेवून बसावे, व माता लाक्ष्मींचे ध्यान करावे. काही वेळ ध्यान करून झाल्यानंतर, माता लक्ष्मीना प्रार्थाना करावी कि, हे माते महालक्ष्मी, आपण माझ्या घरामध्ये कायम, स्थिर स्वरूपामध्ये विराजमान व्हावे. व यानंतर हि फुले आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवावीत. या उपायामुळे आपल्या घरामध्ये माता लाक्ष्मींचा स्थिर निवास होवून जाईल, आपल्या घर धन धान्याने परिपूर्ण होवून जाईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळायला लागतील. किंवा उत्पन्नाच्या साधनामध्ये भरभराट होईल.
मित्रानो, या दिवशी लक्ष्मी नारायण पाठ केल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होतात. पाठ करून झाल्यानंतर माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी विष्णुना खिरीचा नैवेध्या दाखवावा. याच बरोबर मित्रानो शुक्रवारच्या दिवशी असणाऱ्या एकादशी दिवशी एक लाल रंगाचे कापड घेवून, त्यामध्ये सव्वा किलो अखंड तांदूळ घालावेत. हे तांदूळ तुटलेलं किंवा फुटलेले नसावेत, तर अखंड सव्वा किलो तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली बनवावी. व हि पोटली हातामध्ये घेवून || ओम श्रीं श्रिये नमः || या मंत्राचा पाच माळा जप करावा. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये मिळून जाईल. जप पूर्ण झाल्यानंतर हि तांदळाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवावी. या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये धन प्राप्तीचे योग बनायला लागतील. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला धन प्राप्त व्हायला लागेल, अचानकपणे, अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून धन प्राप्तीचे मार्ग बनायला लागती. व आपले जीवन ऐश्वर्य संपन्न बनून जाईल. तर मित्रानो शुक्रवार २८ जानेवारी २०२२ रोजी षटशतीला एकादशीच्या पावन पर्वामध्ये बनत असलेल्या चर आणि ध्रुव या शुभ योगामध्ये, आपले जीवन अधिक बळकट, अधिक सामर्थ्यशाली, वैभव संपन्न, आणि ऐश्वर्य संपन्न बनविण्यासाठी, माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपण हे उपाय अवश्य करा. व आपले जीवन सरळ, सुगम, आणि संपन्न बनवा.
विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.